यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री परसाळे शिवारात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर यावल पोलिसांनी कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री परसाडे शिवारात असलेल्या आसरा बरडी चौफुली रोडवर ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक अंकुश मधुकर सोळूंखे (वय-२८, रा. कोळन्हाव्ही ता. यावल) हा अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असताना यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल चौधरी यांनी चौकशीकामी वाळूने भरलेले ट्रक्टर थांबवले. वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता अंकुश सोळुंके याने परवाना नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान वाळून भरलेले ट्रॅक्टर यावल पोलिसांनी जमा करून यावल पोलीस ठाण्याच्या आवारात लावले. पोलीस कॉन्स्टेबल राहुल रत्नाकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अंकुश मधुकर सोळुंखे आणि धनराज जगन्नाथ सपकाळे (वय-३४, रा. कोळन्हावी ता. यावल) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सिकंदर तडवी करीत आहे.