घरोघरी लसीकरणास सुरुवात पुण्यातून करणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात लवकरच घरोघऱी लसीकरणास सुरुवात पुण्यातून करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने मुंबई हायकोर्टात दिली आहे.

 

घरोघरी लसीकरण करण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुण्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं आहे. केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही असंही राज्य सरकारने मह्टलं आहे. ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

 

घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.  बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज मुंबई हायकोर्टात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचं सांगितलं आहे. केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघऱी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे.

 

Protected Content