जळगावात प्रौढ व्यक्तीच्या पिशवीतून पाच हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा क्रिडा संकुलासमोरून एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या पिशवीतून ५ हजार रूपयांची रोकड चार अनोळखी महिलांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून‍ मिळालेली माहिती अशी की, अविकुमार शंकरराव जोशी (वय-५३) रा. पोलीस चौकी, महाबळ हे पुरोहित आहेत. २९ जून रोजी सकाळी ९.३० वाजता कामानिमित्त जळगाव जिल्हा क्रिडा संकुलात आले होते. त्यावेळी त्याच्या पत्नीने बँकेत भरण्यासाठी ५ हजार रूपयांची रोकड दिली होती. दरम्यान अनोळखी ५ महिलांनी त्यांच्या पांढऱ्या पिशवीतून पाच हजार रूपयांची रोकड लांबविले. याप्रकरणी अविकुमार जोशी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पाच अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content