भुसावळ प्रतिनिधी । ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील भाजपा सरकारच जवाबदार असल्याचा ठपका ठेवत स्थानिक काँग्रेस पदाधिकार्यांनी यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करीत मोदी सरकार व माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रसंगी भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग, काँग्रेस कमेटी, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस. महिला काँग्रेस कमेटी पदाधिकार्यांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान खान, सलीम गवळी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, महिला काँग्रेस अध्यक्ष यास्मीन बानो, शहर उपाध्यक्ष विलास खरात, राणी खरात, हमीदा गवळी, राजु डोंगरदिवे, महेंद्र मसाले, जॉनी गवळी, शैलेश अहिरिे, रमजान खाटीक, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.