एरंडोल, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या उपस्थितीत एरंडोल येथे महिलांनी एकत्र येऊन प्रथमतःच पुस्तक भिशीची स्थापना केली.
पुस्तक भिशीचे उद्घाटन विजय लुल्हे यांनी केले. अध्यक्षस्थानी पत्रकार दीपक महाले होते. प्रमुख अतिथी अथर्व प्रकाशन जळगावचे प्रतिनिधी सुनिल पाटील,रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते. विजय लुल्हे म्हणाले की ,” प्रगल्भ वाचनात सृजनशील लेखन अभिव्यक्तीची सुप्त बीजं असतात. वाचन कौशल्ये विकसित करण्याच्या पद्धती सांगून लुल्हेंनी समाजाभिमुख साहित्यिक उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चा घडवून कृती कार्यक्रमांचे नियोजन करुन घेतले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांसह स्थानिक साहित्यिकांच्या पुस्तकांचे पुजन विजय लुल्हे यांनी करून अभिनव पद्धतीने पुस्तक भिशीचे उद्घाटन केले. एरंडोल पुस्तक भिशीच्या सन्माननीय संस्थापक सदस्या समन्वयिका : क्षमा साळी, सौ.अंजूषा विसपुते, पुष्पा बिर्ला,जयश्री कुलकर्णी , जयश्री पाटील, डॉ.उज्जवला राठी , स्वाती काबरा, उषा खैरनार, शोभा पाटील, शारदा पाटील, प्रा. मिना पवार, संध्या महाजन, श्रीलेखा सोनी.
भिशी उद्घाटनाच्या औचित्याने जळगाव येथील अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी यांनी विविध दर्जेदार २५१ पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शन आयोजन केले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ सदस्या पुष्पा बिर्ला यांनी केले. सूत्रसंचालन क्षमा साळी यांनी आभार मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांनी मानले.