Home Cities भुसावळ लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; एकावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; एकावर गुन्हा

2rapecase 56 1

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. शेती काम करून आपल्या कुटुंबाला आर्थीक मदत करते. संशयित आरोपी दिनेश उर्फ दिनकर मोतीराम कुंभार रा. टहाकळी ता. भुसावळ याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत १० ते १२ वेळा टहाकळी शिवारातील जंगलात अत्याचार केला. घडलेली गोष्ट सांगू नये म्हणून तुझ्याशी लग्न करेल असे सांगितले. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे कळताच पीडीत तरूणीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिनेश कुंभार याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी विवेक लवांड करीत आहे. 


Protected Content

Play sound