नवी दिल्ली वृत्तसंस्था । जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनवीत कौर राणा यांना दिलासा देत हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
अलीकडेच उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे अनुसुचीत जातीचे प्रमाणपत्र रद्दबातल ठरविण्याचा निकाल दिला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यामुळे राणा यांची खासदारकी रद्द होणार असल्याची चर्चा सुरू होती. तर नवनीत कौर यांनी तेव्हाच आपण या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जात पडताळणी करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीचा असल्याने हे प्रकरण संबंधीत समितीकडे पाठविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज निकालात नमूद केले आहे.