Home Cities जामनेर पहूर येथे रक्षाताई खडसे यांची प्रचार रॅली

पहूर येथे रक्षाताई खडसे यांची प्रचार रॅली

0
36

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे आज सायंकाळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपा,शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली काढण्यात आली.

पहूर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रारंभी बसस्थानक परिसरात प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर पहूर कसबे व पहूर पेठ गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा आशावाद यावेळी खासदार खडसे यांनी व्यक्त केला. या प्रचार फेरीत माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, रोहयो तालुकाध्यक्ष समाधान पाटील, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्‍वर पाटील , सरंपच नीता पाटील, सरपंच ज्योती घोंगडे, निर्मला घोंगडे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, युसूफ बाबा, शंकर जाधव, प्रदीप जाधव ,उपसरपंच रवींद्र मोरे, त्र्यंबक हिवाळे,संदीप बेढे, संदीप जाधव , आशा जाधव, गणेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound