Home क्राईम तांबापूरा परिसरात हातगाडी व्यवसायिकाला मारहाण; हातगाडीचेही नुकसान

तांबापूरा परिसरात हातगाडी व्यवसायिकाला मारहाण; हातगाडीचेही नुकसान


जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातील अजमेरी गल्ली येथे हातगाडी व्यावसायिकाला कारण नसतांना बेदम मारहाण केली. तर हातागाडीचे मोठे नुकसान केले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, अनिल नाना नाथ (वय-३०) रा. रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर जळगाव हा तरूण हातगाडीवर किरकोळ वस्तू विकण्याचे काम करतो. १० जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील तांबापूरा भागात असलेल्या अजमेरा गल्लीतून अनिल नाथ हातगाडी घेवून जात होता. त्यावेळी काहीही कारण नसतांना सुलतान काल्या (पुर्ण नाव माहित नाही) याने शिवीगाळ करून अनिल याला मारहाण केली. तर गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. ‘जा जे होईल ते करून घे’ अशी धमकी दिली. अनिल नाथ यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुलतान काल्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन पाटील करीत आहे. 


Protected Content

Play sound