महानगर राष्ट्रवादीतर्फे मंगला पाटील यांचे अभिनंदन

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर महिला जिल्हाध्यक्षपदी  मंगला पाटील यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचे  महानगर राष्ट्रवादीतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षपदी मंगला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले. आज त्यांचे  महानगर राष्ट्रवादीतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष कल्पना पाटील,  महानगर सचिव कुणाल पवार, जयश्री पाटील, दिव्या भोसले, आरोही नेवे ,कल्पिता पाटील, महाजन सर, प्रतिभा शिरसाठ , अर्चना कदम, उज्ज्वला  शिंदे,   कोमल पाटील, ममता तडवी व आदी  पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content