Home क्राईम चहार्डी येथे विवाहितेवर अत्याचार; एकाला अटक

चहार्डी येथे विवाहितेवर अत्याचार; एकाला अटक


चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चहार्डी येथील ५३ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास चोपडा पोलीसांनी अटक केली असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील चहार्डी येथील ५३ वर्षीय महिले आपल्या कुटुंबियासह राहते. ९ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरात कुणीही नसतांना रायसिंग ताराचंद बारेला (वय-43) रा. चहार्डी ता. चोपडा हा अनाधकृतपणे महिलेच्या घरात घुसून महिलेवर तोंडात रूमाल कोंबून अत्याचार केला. पिडीतेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच अवघ्यात दोन तासात संशयित आरोपीला चोपडा शहर पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे. 


Protected Content

Play sound