Home Cities भुसावळ डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीने चैतन्य- सोनवणे ( व्हिडीओ )

डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीने चैतन्य- सोनवणे ( व्हिडीओ )

0
42

भुसावळ प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात चैतन्याचे वातावरण असून यातूनच त्यांचा विजय साकारणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्‍वभूमिवर, लाईव्ह ट्रेंडस् न्यूज विविध पक्षांच्या मान्यवरांना बोलते करत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, तालुक्यातील फेकरी येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा सोनवणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रावेरातून आघाडीचा उमेदवार विजयी होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की, देशभरात आता परिवर्तनाची नांदी सुरू झाली असून रावेरातदेखील तेच होणार आहे. या मतदारसंघातून डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे आधीच चैतन्याचे वातावरण निर्मित झाला आहे. यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीआरपी महाआघाडीचे सर्व नेते एकदिलाने कामाला लागले असून यातूनच त्यांचा विजय साकारणार असल्याचा आशावाद प्रभाकर सोनवणे यांनी व्यक्त केला.

पहा : प्रभाकर सोनवणे नेमके काय म्हणालेत ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound