Home Cities जळगाव काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सचिवपदी मुफ्ती हारून नदवी

काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सचिवपदी मुफ्ती हारून नदवी

0
76

जळगाव प्रतिनिधी । येथील मुफ्ती हारून नदवी यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या अमोघ वक्तृत्वामुळे देशभरात ख्यात असणारे मुफ्ती हारून नदवी यांनी समाजवादी पक्षाचा त्याग करून अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. आपण आगामी काळात काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया मुफ्ती हारून नदवी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली. दरम्यान, या नियुक्तीबद्दल त्यांचे मान्यवरांसह सर्वसामान्यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound