ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

गुढीपाडव्यानिमित्त महावीर ज्वेलर्समध्ये मंगळसूत्र खरेदीवर मिळतेय ‘ही’ सवलत ! ( व्हिडीओ )

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । येथील महावीर ज्वेलर्स या ख्यातप्राप्त आभूषणांच्या दालनात गुढीपाडव्यानिमित्त मंगळसूत्र खरेदीवर विशेष सवलत देण्यात आली असून याला भगिनीवर्गाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

शहरातील नवीपेठ भागात असणार्‍या महावीर ज्वेलर्स या प्रशस्त दालनात ग्राहकांसाठी वेळोवेळी आकर्षक सवलती आणि योजना जाहीर करण्यात येतात. याला ग्राहकांनी नेहमीच उदंड प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आपला हा लौकीक कायम ठेवत महावीर ज्वेलर्सने गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनोखी योजना जाहीर केली आहे. गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी होत असते. नेमक्या याच कालखंडात महावीर ज्वेलर्समध्ये खास मंगळसूत्रासाठी एक अफलातून सवलत जाहीर करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत ग्राहकाला मंगळसूत्रासाठी लागणार्‍या मजुरीत तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. आपल्याला हव्या असणार्‍या मंगळसूत्रासाठी लागणार्‍या मजुरीची रक्कम ही खूप मोठी असते. यामुळे यातच तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आल्याने भगिनीवर्गासाठी ही योजना अतिशय उपयुक्त असून याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, महावीर ज्वेलर्समध्ये अतिशय उत्तमोत्तम डिझाईन्सने युक्त असणारे मंगळसूत्र उपलब्ध आहेत. यामुळे भगिनीवर्ग याला या योजनेच्या अंतर्गत खरेदी करू शकणार आहे.

दरम्यान, महावीर ज्वेलर्सने यासोबत सुवर्ण संचय ही दुसरी अतिशय अनोखी योजना जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत ग्राहक अगदी एक हजार रूपये महिना भरूनदेखील या योजनेत सहभागी होऊ शकतो. यानंतर शंभरच्या पटीत रक्कम भरून सहभागी होता येणार आहे. यात कुणीही ग्राहक आपल्याला हव्या त्या वेळेस सहभागी होऊ शकतो. तसेच यातून बाहेर पडण्यासाठी सुलभ सुविधादेखील देण्यात आलेली आहे. यामध्ये मजुरी खर्चात बचत अथवा वा सुट देण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत हॉलमार्क असणार्‍या दागिन्यांवर सवलत देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना याचा अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

महावीर ज्वेलर्समध्ये तब्बल दोन दशकांपासून सचोटीची ग्राहकसेवा प्रदान करण्यात येत आहे. अत्युच्च गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे महावीर ज्वेलर्सने चोखंदळ ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. येथे सोने, चांदी, हिरे, मोती आदींसह राशी रत्न, पूजा सामान आणि चांदीची भांडी आदींच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपणदेखील या भव्य दालनास भेट देऊन आभूषणांची खरेदी करू शकतात.

संपर्क

महावीर ज्वेलर्स
११७, नवीपेठ जळगाव
०२५७-२२२१८३९/४०
९९७५७१४१०४

पहा : महावीर ज्वेलर्सच्या अनोख्या योजनेबाबतचा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवरील अचूक लोकेशन.