राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अनपेक्षित निधनाच्या पार्शवभूमीवर त्यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवले आहे
” बिछडा कुछ इस अदा से की रुत ही बदल गई,
इक शख्स सारे शहर को विरान कर गया…!”
मौत सबसे बडी सच्चाई और तलख् हकीकत है|
इस के विषय मे इन्सानी दिमाग हमेशा से सोचने के साथ साथ हरदम सवाल करता रहा है और जबाब तलाशता रहा है. लेकिन ये एक ऐसा मुवम्मा है, जो न समझमे आता है, और न ही हल होता है. लेकिन जिंदगी का सफर कैसा रहा, क्या कर गुजर गये…?
” माना कि इस जमी को न गुलजार कर सके
कुछ खार कम तो कर गए गुजरे जिधर से हम”
मुस्लिम समाजाचा चेहरा…
हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे, सोमवारी रात्री माझ्या मुस्लिम मित्राचा रात्री 11 वाजता फोन आला आणि म्हणाला हाजी सहाब नही रहे, हा फोन वरणगाव येथून होता, योगायोगाने माझ्या वरणगावच्या मित्राचे नावही गफ्फार आहे, त्याने दिलेल्या बातमीने अस्वस्थ झालो… इतरांसाठी ते नेते असतील, पण माझ्यासाठी ते मोठे बंधू होते. पत्रकारितेच्या प्रवासात ते जळगाव शहरातील राजकीय घडामोडी, भूतकाळातील काही अनटोल्ड किस्से याचा नेमका संदर्भ व माहिती देणारं चालताबोलता एनस्यक्लोपेडिया होते. कोणतीही चांगली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमीवर नसतांना गफ्फारभाई यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात जो लौकिक कमावला तो थक्क करणारा आहे. जेमतेम उर्दू सातवीपर्यन्त शिक्षण असलेल्या गफ्फारभाई यांची वक्तृत्वशैली एखाद्या साहित्यकार अथवा वक्तृत्वपटू पेक्षा सरस होती.
शैक्षणिक क्षेत्रात अब्दुल करीम सालार यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम समाजात क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रातही पक्ष व विचारांची निष्ठा कायम ठेवली, सुरेशदादा जैन यांच्या राजकीय वाटचालीत मलिक व सालार या जोडीचे मोठे योगदान राहिले आहे. गफ्फारभाई राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात अधीक वावरले. कोणताही गाजावाजा न करता विधवा, परित्यक्ता व असहायासाठी त्यांनी काम केले, केवळ मुस्लिम समाजातीलच नव्हे तर दलितांनाही त्यांनी सतत मदत केली. प्रत्येक समाज समुदायाबद्दल प्रेम व आपुलकी, आदरभाव बाळगणारे गफ्फार भाई खऱ्या अर्थाने जळगाव शहराच्या राष्ट्रीय एकात्मतेचा चेहरा होते, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही… प्रत्येका बद्दल आदरभाव ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाची उणीव नेहामीच भासत राहील, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
बडे शौक से सुन रहा था जमाना मगर….
आप ही सो गये दास्तां कहते कहते..”
सुरेश उज्जैनवाल