अजित पवार अंधारात होते, ही फोडाफोडी नाही : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) पारनेरच्या नगरसेवकांना परत करण्याची मागणी केली असेल तर मी तुम्हाला कशाला सांगू. पारनेरचा विषय लहान आहे, स्थानिक विषय आहे. त्या घटनेचा अजित पवारांचा कसा संबंध नाही. अजित पवार अंधारात होते. ही फोडाफोडी नाही, परंतु अशा प्रकारे एकमेकांच्या लोकांना प्रवेश देताना यापुढं चर्चा व्हायला हव्यात, असंही राऊत यावेळी म्हणाले.

 

 

संजय राऊत यांनी पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, शरद पवार हे अधूनमधून मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले. तसेच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेला राऊतांनी उत्तर दिले आहे. कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुख्यमंत्री चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र केंद्राने दिले आहे. त्यामुळे स्थानिक लेवलला कोण काय म्हणतंय हे मला माहिती नाही, असेही राऊत म्हणाले. बदल्या या प्रशासकीय बाबी आहेत, यात राजकारण नाही. यामुळे अंतर्विरोध आहे असे कुणी समजून कुणाला आनंद होत असेल तर तेही तेवढे खरे नाही, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.

Protected Content