Home राजकीय रावेर पंचायत समितीची ऑनलाईन आढावा बैठक

रावेर पंचायत समितीची ऑनलाईन आढावा बैठक

0
34


रावेर प्रतिनिधी । रावेर पंचयात समितीची मासिक आढावा बैठक सभापती कविता कोळी यांच्या अध्यक्षेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यावेळी कोरोनासंबंधित  प्रलंबीत कामे यांच्यासह विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सचिव म्हणुन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी कामकाज पाहीले.

रावेर पंचायत समितीची मासिक बैठक ऑनलाईन व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आले. बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा विभाग, सिंचन विभाग, बस महामंडळ, कृषी विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, बाल विकास प्रकल्प, पशुसवंर्धन, शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी यांनी बैठकीत आपल्या विभागाचा आढावा मांडला.  

मासिक बैठकीत यांनी घेतला सहभाग 

दरम्यान ऑनलाईन व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आले. बैठकीला सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, दिपक पाटील, जुम्मा तडवी, पी. के. महाजन, योगेश पाटील, माधुरी नेमाडे, योगिता वानखेडे, प्रतिभा बोरवले आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.


Protected Content

Play sound