Home Cities भुसावळ जाम मोहल्ल्यात डॉ. उल्हास पाटील यांनी साधला संवाद

जाम मोहल्ल्यात डॉ. उल्हास पाटील यांनी साधला संवाद

0
38

भुसावळ प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी रात्री शहरातील जाम मोहल्ला भागात प्रचारासाठी धावती भेट घेऊन बैठक घेतली.

डॉ. उल्हास पाटील यांनी जाम मोहल्ला भागातील मुख्य चौकात परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशासह रावेर लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून निधर्मी विचारधारेला बळकट करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र पाटील, युथ काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान खान, आर.के. किताबघरचे जमीलभाई, वहाब पहेलवान, शेख नजीर, अय्यूब खान, डॉ. निजाम पटेल, नसीम तडवी, जाकीर भुसावली आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound