Home धर्म-समाज पाचोरा व भडगाव तालुक्यात माजी मंत्री महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पाचोरा व भडगाव तालुक्यात माजी मंत्री महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम


पाचोरा, प्रतिनिधी ! येथील भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगावच्या वतीने मा. मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही पद्धतीचे बोर्ड – बॅनर न लावता कोरोनासारख्या परिस्थितीत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. 

 

तसेच चिटणीस सोमनाथ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावागावात सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात करण्यात आली. भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावापासून करण्यात आली. यामध्ये पाचोरा –  भडगाव तालुका मिळून जवळपास ५० गावांमध्ये ही फवारणी केली जाणार असून, त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावे निर्जंतुकीकरण करुन याचा नक्कीच लोकांच्या आरोग्यासाठी फायदा होईल असे यावेळी अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. तसेच आमदार महाजन यांनी जिल्ह्यातील कोरोणाच्या बिकट परिस्थितीमुळे वाढदिवस साजरा न करता लोकाभिमुख उपक्रम राबवावे असे आवाहनही केले होते. त्या निमित्ताने आम्ही पाचोरा व भडगाव तालुक्यातून जवळपास ५० गावे ही फवारणी करून निर्जतुकीकरण करण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात आज भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी या गावातून करीत आहोत. असे देखील त्यांनी बोलतांना सांगितले. तसेच यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांना फळ वाटप करून आमदार महाजन यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


Protected Content

Play sound