मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असून याची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय जैन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
सविस्तर असे की, गौण खनिज कायद्यांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यात वाळूचा उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतांना मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस बेकायदेशीर वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. ट्रॅक्टर आणि डंपर भरून जात असल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे. अश्या अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांची मुक्ताईनगर तहसीलदारांची चौकशी करावी अशी मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय जैन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले आहे.