Home क्राईम नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

0
41
two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना गुरूवारी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर असे की, अनंत प्रकाश महाजन (वय-३७) रा. धानोरा ता.चोपडा जि.जळगाव हे शेतकरी आहे. बुधवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १९ सीए ४३९५) ने आले. हॉस्पीटलसमोर असलेल्या मोकळ्या रोडवर दुचाकी पार्किंग करून लावली. दुसऱ्या दिवशी गुरूवारी ६ मे रोजी दुपारी १२ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. अनंतर महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे. 


Protected Content

Play sound