‘जैश’ च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यास अटक

01 04 2019 terrorist faiyaz ahmad lone 19092339 11447818

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. तसेच त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.

 

दरम्यान लवामा येथील लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत लष्कर ए तोएबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल्स, एक एसएलआर आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. परिसरात अद्यापही लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Add Comment

Protected Content