जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगर आणि हरीविठ्ठल नगरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर रामानंदनगर पोलीसांनी कारवाई करत तीन जणांकडून २ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, शहरातील समता नगर आणि हरीविठ्ठल नगरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांनी तीन ठिकाणी छापा टाकून २ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात महेंद्र सुरेश राणे (वय-४६) रा. समता नगर यांच्याकडून १ हजार ७५० रूपये किंमतीची ३५ लीटर गावठी दारू, विशाल अरूण गारूंगे (वय-४६) रा. समता नगर २५० रूपये किंमतीची ५ लीटर गावठी दारून आणि लक्ष्मी भानूदास बाडगे रा. हरीविठ्ठल नगर हिच्याकडून ९०० रूपये किंमतीची १८ लीटर गावठी दारू असा एकुण २ हजार ९०० रूपये किंमतीची गावठी दारू हस्तगत केली. तिघांविरूध्द रामानंदनगर पोलीसात पो.कॉ. संजय तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे.