जळगाव प्रतिनिधी । कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बळीराम पेठेतील अत्यावश्यक सेवा वगळात इतर दुकाने लपून छपून व्यवसायक करणाऱ्या ११ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सीलबंद केले. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिली.
सविस्तर असे की, जळगाव शहरात कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पर्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे कडक सुचना देण्यात आले आहे. असे असतांना जळगाव शहरात काही ठिकाणी अनेक दुकानदार शटर बंद ठेवून आत व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत पथकाने आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील बळीराम पेठेतील ११ दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. यात बळीराम पेठेतील बजाज ट्रेडर्स, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, निनावी तसेच जय वैष्णवी जनरल स्टोअर्स बाहेरा गल्ली, वाहेगुरू इलेक्ट्रिकल जेएमपी मार्केट, नंदुरबारकर सराफ, नागदवे इंटरप्रायझेस गजानन प्लाझा बळीराम पेठ अशा ११ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत सीलबंद कारवाई केली.
ही कारवाई उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी केली.