Home क्राईम मुक्ताईनगरात कापड व्यापाऱ्याचे बंद घर फोडले; ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगरात कापड व्यापाऱ्याचे बंद घर फोडले; ५८ हजाराचा मुद्देमाल लंपास

0
40


मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील जुने बाजार गल्ली तील राहणाऱ्या एका कापड व्यवसायिक व्यापाऱ्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.  या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमित कांतीलाल जैन (वय-३४, रा.जुने बाजार गल्ली मुक्ताईनगर) हे कापड विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २६ ते २७ एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरात कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी  कपाटात ठेवलेली ८ हजार रुपयांची रोकड व ५० हजार रुपये किमतीचे दागिने असा एकुण ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.  अमित जैन यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सादिक पटवे करीत आहे.


Protected Content

Play sound