यावल प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूकीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील साकळी येथे घडली. याप्रकरणी यावल पोलिसात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साखळी येथील (वय-४५) महिला आपल्या कुटुंबियांसह राहते मिळेल. महिलेचा याचा भाचा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यामुळे त्याचा राग मनात धरून गावातील मिलिंद साहेबराव जंजाळे, अशोक श्रावण जंजाळे, शंकर अशोक जंजाळे, विजय हरी जंजाळे, विजय प्रल्हाद जंजाळे, विलास भिला सोनवणे, विशाल प्रकाश बाविस्कर, अरूणाबाई अशोक जंजाळे, रेखा प्रकाश बाविस्कर, देवानंद जगन जंजाळे आणि नाना सूर्यभान जंजाळे यांच्यासह इतर पाच ते दहा जण सर्व रा. साकळी ता. यावल यांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन महिला व तिच्या भाच्याला शिवीगाळ केली. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असतील शिवीगाळ केली. विवाहितेसोबत असलेल्या एका महिलेला देखील मारहाण केली. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार करीत आहे.