जळगाव प्रतिनिधी । आज मंगळवार २ एप्रिल रोजी जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्याहस्ते आरोग्य विभागाच्या बाहय रुग्ण विभागाचे फीत कापून व धन्वंतरी पुजन करुन उद्घाटन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषद येथिल इमारतीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांच्याकरीता बाहय रुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे.
या उदघाटन प्रसंगी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, आरोग्य विभागाचे डॉ मनोहर बावणे, आर्युवेदीक विस्तार अधिकारी, साथरोग अधिकारी बावळे, वैदयकिय अधिकारी शरद चौधरी, कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे, सांख्यिकी अधिकारी श्री.वाणी, कार्यालयीन अधिक्षक नुतन तासखेडकर, विस्तार अधिकारी विद्या पाटील, डिपीएचएन विद्या राजपूत, विजय कांबळे, किशोर पाटील, निलेश पाटील, सुरेश मराठे, बी.टी. सूर्यवंशी, विजया पाटील आदी उपस्थित होते.
या विभागांत एक डॉक्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सेविका आहेत. हा बाह्य रुग्ण विभाग सकाळी १० ते १ त दुपारी ३ ते ६ सुरु राहणार आहे.जेणेकरून जि.प.कार्यालयीन कर्मचारी यांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल. बाहय रुग्ण विभागात सर्दी खोकला, ताप उलटी,जुलाव अशा किरकोळ आजार व रक्तदाबाचे निदान , मधुमेहाचे निदान व उपचार त्वरीत केले जाणार आहे. आजारी रुग्णाला सामान्य रुग्णालय येथे संदर्भित केले जाणार आहे. बाहय रुग्ण विभाग सुरु करणेकामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस.कमलापुरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, माता बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ, यांनी पाठपुरावा केला.