Home Cities जळगाव गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; जळगाव मनपा समित्यांचे पक्षनिहाय समीकरण स्पष्ट

गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; जळगाव मनपा समित्यांचे पक्षनिहाय समीकरण स्पष्ट

0
110


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडी प्रक्रियेला आता वेग आला आहे. आज महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची विशेष बैठकीत दोन्ही समित्यांच्या सदस्य संख्येचे पक्षनिहाय समीकरण निश्चित करण्यात आले असून, येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत नवीन सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पक्षनिहाय बलाबल आणि सदस्य संख्या महापालिकेतील नगरसचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समितीसाठी एकूण १६ सदस्य तर महिला व बालकल्याण समितीसाठी ९ सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

स्थायी समिती (१६ जागा): भाजप – १०, शिवसेना (शिंदे गट) – ५, शिवसेना (ठाकरे गट) – १.

महिला व बालकल्याण समिती (९ जागा): भाजप – ५, शिवसेना (शिंदे गट) – ३, शिवसेना (ठाकरे गट) – १.

निवड प्रक्रिया आणि सभापतीपद या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी माहिती दिली की, १६ फेब्रुवारीच्या विशेष सभेत केवळ सदस्यांची बंद पाकिटातीन नावांची घोषणा करून नियुक्ती केली जाईल. या सदस्यांमधून सभापतींची निवड करण्यासाठी नंतर स्वतंत्र दिवस निश्चित केला जाणार आहे.

या निवडीमुळे महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. विशेषतः स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र स्पष्ट झाल्याने आता प्रत्यक्ष नावांची घोषणा कोणाची होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound