रावेर प्रतिनिधी । आज प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी कोरोना सेंटरची पाहणी करून उपाययोजनांबाबत निर्देश दिले आहेत.
फैजपुर प्रांतधिकारी कैलास कडलग आज रावेर दौर्यावर होते. येथील कोविड केअर सेंटरबाबत भाजपा पदाधिकार्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी आज कोविड सेंटरच्या पाहणी केली सोई-सुविधाची माहिती घेतली कोविड सेंटरच्या बाहेर पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सध्याचा काळ अत्यंत वाईट सुरु असून नागरीकांनी देखील काळजी घेण्याचे अवाहन प्रांतधिकारी यांनी केले आहे.
रावेर तालुक्यात ३ हजार ५९० कोरोना बाधित होते. त्यापैकी ५३० कोरोना पेशंट सक्रीय आहे.त्यामुळे तालुक्यात बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्के आहे.तर कोरोना मुळे आता पर्यंत ११९ जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे तालुक्यात मृत्युदर हा ३ टक्के असल्याचे वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी सांगितले.
ड्युरा सिलेंडरसाठी ५१ हजाराची मदत
दरम्यान रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने,तेथे मोठ्या ड्युरा सिलेंडरची गरज निर्माण झाली. यासाठी दानशुरांनी पुन्हा सहकार्य करण्याचे अवाहन प्रांतधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. अवाहनाला प्रतिसाद देत आज केळी व्यापारी सुरेश नाईक यांनी ५१ हजाराची आर्थिक मदत प्रशासना कडे चेक स्वरूपात केली आहे.
तहसिलमध्ये बैठक
आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी तालुक्याच्या महत्वाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोना व्हायरसच्या उपाय-योजने संदर्भात माहिती जाणून घेतली व सूचना केल्या यावेळी बैठकीला तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन आदी उपस्थित होते.