जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात लवकरात लवकर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी करण्याच्या सूचना महापौर सौ.जयश्री महाजन यांनी बैठकीत दिल्या होत्या. महापौरांच्या सुचनेनंतर प्रशासनाने लागलीच उपाययोजना सुरू केल्या असून शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. महापौरांच्या सूचनेनुसार शुक्रवारी महापालिकेतर्फे शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. अग्निशामन दलाच्या बंबांमधून सॅनिटायझर भरून याची ठिकठिकाणी फवारणी करण्यात आली. महापौर जयश्री महाजन यांनी दिवसभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/788739152041643