Home Cities रावेर आमदार शिरीष चौधरी देणार दोन ड्युरा सिलेंडर

आमदार शिरीष चौधरी देणार दोन ड्युरा सिलेंडर

0
75

रावेर प्रतिनिधी । कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रावेर आणि फैजपूर येथील रूग्णालयांना प्रत्येकी एक ड्युरा सिलेंडर देण्याची घोषणा आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे. ते निंभोरा येथे बोलत होते.

निंभोरा पोलिस ठाण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या नवीन वाहनाचे पूजन आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलतांना त्यांनी स्वत:तर्फे दोन ड्युरा सिलेंडर देण्याची घोषणा केली. ड्युरा सिलेंडरमुळे प्राणवायूचा वाढीव साठा करता येणार असून याचा रूग्णांना लाभ होणार आहे.

रावेर व फैजपूर येथील रुग्णालयात ऑक्सिजन संदर्भातील अडचणी पाहता दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर टँकची लवकरच उपलब्धता करून देणार असल्याचे आ. शिरीष चौधरी यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, राकेश वराडे आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound