चोपडा व रावेर बाजार समितीला सहा महिने मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चोपडा आणि रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे अलीकडेच सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील चोपडा आणि रावेर कृषी उत्पन्न बाजारपेठ समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. रावेर बाजार समितीला मुदतवाढ मिळण्याची मागणी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात समितीचे संचालक नीलकंठ चौधरी व पितांबर पाटील यांनी केली होती. याला मान्य करण्यात आल्याने आता सहा महिन्यांची दुसर्‍यांदा मुदतवाढ मिळाली आहे.

दरम्यान, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास अधिनियम १९६३ आणि नियम १९६७ नुसार ही वाढ देण्यात आल्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी जयंत भोईर यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील यांनी दिली आहे. यामुळे येथील संचालक मंडळासही आता सहा महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ मिळणार आहे.

Protected Content