चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत असताना विना मास्क धारकांची संख्या हि वाढत आहे. हि गोष्ट लक्षात येताच पोलीस प्रशासन व चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने येथील बायपासला विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. त्यात विना मास्क धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. हि गंभीर बाब लक्षात येताच तालुक्यातील चैतन्य तांडा व ग्रामीण पोलिस प्रशासनातर्फे विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हि कारवाई आज रात्री ८:३० वाजताच्या सुमारास येथील बायपासच्या विराम लॉन्स समोर करण्यात आली. यावेळी एकूण सहा जणांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकाला दोनशे रुपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आले असून एकूण १२०० रुपये वसूली यावेळी करण्यात आली.
या कारवाईत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, हवालदार युवराज नाईक, हवालदार सोनवणे, हवालदार रुपेश वंजारी, करगांव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड व ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड आदी उपस्थित होते.