Home आरोग्य राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन

0
25

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून कार्यकर्त्यांची राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार सर्वत्र तालुका पातळीवर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यात कोरोना वाढत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये ही शिबिरे आयोजित करून तसा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्याबाबत पत्रात म्हटले आहे.

प्रदेश कार्यालयाच्या या निर्देशानंतर आता जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound