Home राजकीय अजित पवारांच्या हातून शरद पवारांची ‘हिट विकेट’ : मोदी

अजित पवारांच्या हातून शरद पवारांची ‘हिट विकेट’ : मोदी


sharad pawar narendra modi

वर्धा (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. ‘पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. शरद पवारांवर चौफेर हल्ला चढवताना, ‘शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली’ असे जोरदार टोला मोदी यांनी पवार यांना लगावला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिटविकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळयांच्या आरोपांची उदहारणे दिली.

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील सरकार भ्रष्ट सरकार होते. पैसे खाण्याचेच काम त्या सरकारने केल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound