Home क्राईम शॉर्टसर्किटमुळे शेतातील गव्हाचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे शेतातील गव्हाचे नुकसान


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा शिवारात इलेक्ट्रीक ताराच्या झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील काढली आलेला गहू जळून नुकसान झाल्याची घटना घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. 

पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मधुकर दोधू सरोदे (वय-६४) रा. महाजन वाडा, असोदा ता. जि.जळगाव यांचे आसोदा शिवारात शेत गट नंबर १५/९१ मध्ये शेती आहे. शेतात त्यांनी गहू पेरला होता. ३० मार्च रोजी दुपारी ३.५० वाजेच्या सुमारा शेतातून गेलेल्या तारांचा एकमेकांशी संपर्क आल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील गहू जळून खाक झाला यात अंदाजे ५ ते ६ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मधुकर सरोदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे. 


Protected Content

Play sound