Home Uncategorized मुख्यमंत्री यांच्या पत्नी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री यांच्या पत्नी रुग्णालयात दाखल

0
39


 

मुंबई, वृत्तसंस्था   सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं.

 

रश्मी ठाकरे ह्या विलगीकरणात असताना त्यांना  खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं. दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रश्मी ठाकरे यांच्याआधी त्यांचे सुपूत्र आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरेंनी २० मार्चला ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली होती. आदित्य ठाकरेंच्या संपर्कात असल्याने रश्मी ठाकरे यांचीही चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर त्या विलगीकरणात राहत होत्या. पण खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 


Protected Content

Play sound