मनसे उघडपणे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार

 

 

 

 

download 12

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार या निर्णयावर आज राजगडावर झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. राजगडावर आज मनसे विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी या संदर्भातल्या स्पष्ट सूचना दिल्या. मनसे कार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेना आणि भाजपा विरोधात बिनधास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा, असे नांदगावकर यांनी सांगितले.

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आणि त्यानंतर झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी आपली लढाई मोदींविरोधात आहे. शाह आणि मोदी यांना हटवण्यासाठी पक्ष कोणता ते पाहणार नाही. जे पक्ष मोदींचा विरोध करत आहेत, त्यांना साथ देणार, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

तसंच एअर स्ट्राईकबाबत धादांत खोटी माहिती पसरवली जाते आहे. खोट्या फोटोंच्या आधारे प्रचार केला जातो आहे, आणि मतं मागितली जात आहेत. खोट्या प्रचाराला भुलू नका. नरेंद्र मोदी हा अत्यंत खोटारडा माणूस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या आणि मोदींवर निशाणा साधला होता.

Add Comment

Protected Content