टीएमसीचे निवडणूक आयोगाला निवेदन; मतदान केंद्रावर केवळ केंद्रीय सैन्य तैनात नको

 

कोलकाता : वृत्तसंस्था । तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल निवडणुकांसंदर्भात  पक्षपाती पध्दतीचा अवलंब केला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ केंद्रीय सैन्य तैनात नकोय

 

मतदान संपल्यानंतर ईव्हीएमसह व्हीव्हीपीएटी मशीन्सची पूर्णपणे पडताळणी करावी अशी विनंती देखील टीएमसीने आयोगाला केली आहे.

 

“पश्चिम बंगाल राज्यात स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका दूरदूरचे वास्तव होत चालले आहे हे स्पष्ट होत आहे. हे निवडणूक आयोगाने चालू निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या पक्षपाती पध्दतीच्या निर्णयांवरून स्पष्ट होते. राज्यात, असे टीएमसीने आयोगाला दिलेल्या निवेदनात लिहिले.

 

टीएमसीच्या पत्रात असे म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केंद्रीय सैन्य तैनात करण्याचा निर्णय आयोगाने मतदान असलेल्या अन्य राज्यांसाठी का  घेतला नाही.

 

या पत्रात म्हटले आहे की, आयोगाने केंद्रीय दलात तैनात करणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा सामना करण्याची घटनात्मक जबाबदारी असलेल्या राज्य सरकारच्या अधिकारांना डावलणे होय.

 

टीएमसीने पत्रात म्हटले आहे की, “स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी राज्य व केंद्रीय दलांमध्ये योग्य समन्वय असावा आणि राज्य आणि केंद्रीय पोलिस दलांचे एकत्रित गट मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत तैनात करावेत, अशी आमची मागणी आहे.”

 

“आम्ही आशावादी आहोत की आम्ही केलेल्या सूचनांवर तुम्ही विचार कराल आणि लोकशाहीमधील मतदारांचे हित जपण्याच्या व्यापक हितासाठी या अंमलबजावणीसाठी तुम्ही योग्य ते प्रयत्न कराल,” असे या पत्रात नमूद केले आहे.

Protected Content