Home Agri Trends बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाईची मागणी ; आमदार चव्हाण संतापले

बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाईची मागणी ; आमदार चव्हाण संतापले

0
35


 

चाळीसगाव: प्रतिनिधी । शेतकरी आधीच संकटात  असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणेची विक्री केली गेली . कणसाला धान्यच नसल्याचे प्रकार बोरखेडा, उंबरखेड व इतर ठिकाणी घडल्याने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार  मंगेश चव्हाण  यांनी केली आहे.

 

दरवर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जीवाचे रान करणार्या शेतकऱ्यांकडे निसर्ग नेहमी पाठ फिरवतो  मात्र बोगस बियाणे उत्पादित करून कंपन्या आता शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. असा गंभीर प्रकार बोरखेडा, उंबरखेड व इतर ठिकाणी घडला आहे. पिक तर जमीनीत आले  परंतु ज्वारीच्या कणसाला धान्यच नसल्याने गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना भेटून समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची फसवणूक करणारी हायटेक कंपनीच्या ज्वारी वाण ३२०१, ३२०६ हि वाण शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात स्थानिक कृषी केंद्रामार्फत शेतात लावले असता. कणसाला धान्यच नसल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. त्यामुळे या कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी या निवेदनाची  प्रत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडेही रवाना केली आहे.

 


Protected Content

Play sound