जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 33 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात 7 हजार 898 जणांना पहिली लस तर 645 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 58 हजार 972 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज 15 मार्च रोजी 992 बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आले आहे. कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 33 ठिकाणी लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज सोमवार 15 मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय- 0, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल- 276, गोल्ड सीटी हॉस्पिटल-0, गाजरे हॉस्पिटल-0, ऑर्किड हॉस्पिटल-0, जैन हॉस्पिटल-0, जामनेर-96, चोपडा-84, मुक्ताईनगर-77, चाळीसगाव-106, पारोळा-84, भुसावळ-309, अमळनेर-110, पाचोरा-73, रावेर-62, यावल-104, भडगाव-61, बोदवड-69, एरंडोल-803, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-36, धरणगाव-81, एम.डी. भुसावळ-136, खडका रोड केंद्र-149, यावल रोड भुसावळ केंद्र-156 आणि पीएचसी सेंटरवर 5 हजार 256, बाद्री प्लॉट भुसावळ-189, पाल- 12, पिंपळगाव-48, पहूर-51, मेहरूण-0, नाव्ही-104, सावदा-61, वरणगाव-25 असे एकुण 7 हजार 898 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 645 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.