आता मंत्रालयात कर्मचाऱ्यांची ड्युटी एका दिवसाआड

 

मुंबई:  वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे.  मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आता  कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार असून तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलमधील गर्दीमुळे ही संख्या अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे मंत्रालयात शिफ्टची वेळ बदलण्यात आली होती. मंत्रालयात एका शिफ्ट ऐवजी दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मंत्रालयातील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने अखेर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

मुंबईत कोरोनाची संख्या वाढत असल्याने मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपासून मुंबईत दिवसा आणि रात्रीही मोठी गर्दी होत आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

राज्यात 1 लाख 26 हजार 231 सक्रिय रुग्ण आहेत.  मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे . कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे

Protected Content