चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने गावात केलेल्या भरीव कामगिरीमुळे अल्पावधीतच आदर्श गावाचा बहुमान पटकावले आहे. त्यामुळे इतर ग्रामपंचायतीने यातून बोध घेऊन आपला गाव समृद्ध करावा या उद्देशाने लोकउद्दार फाउंडेशनच्या वतीने सरपंच व सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तालुक्यातील चैतन्य तांडा क्र. ४ ग्रामपंचायतीने स्वच्छता, १०० टक्के हागणदारीमुक्त गाव व जलसाठावर केलेल्या कामामुळे आदर्श गाव म्हणून बक्षीस वितरण करण्यात आले आहे. चैतन्य तांडा ग्रामपंचायतीप्रमाणे इतर ग्रामपंचायतीने आपली वाटचाल आदर्श गावाकडे करावी. या पार्श्वभूमीवर लोक उद्दार फाउंडेशनतर्फे सरपंच आनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रा.पं. सदस्य वसंत राठोड, सतीश राठोड, भाईदास राठोड, विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, कैलस बापू, रवींद्र राठोड आदींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी लोकउद्धार फाऊंडेशनचे सचिव भरत पवार, गोकुळ राठोड, विस्तारधिकारी आर्जुन चव्हाण, कुणाल चव्हाण व इतर मंडळी उपस्थित होती. मध्यंतरी गावाच्या विकासकामांसाठी लोकउद्धार फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पाच हजार रुपयांची भरीव मदत केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी या संस्थेचे आभार मानले होते. आज हि संस्था अभ्यास वर्ग टीम म्हणून गावात दाखल झाले. गावाची पाहणी दरम्यान आमचाही गाव आम्ही अशाच प्रकारे समृद्ध करण्यासाठी धडपड करू असे लोकउद्धार फाउंडेशनच्या अभ्यास वर्ग टीमने यावेळी सांगितले.