शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी येथील रहिवासी व बोदवड येथील राका हायस्कुलमध्ये कार्यरत शिक्षकाचा भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे संशयास्पद मृत्यू मृत्यू झाल्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.  याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील तालुक्यातील महेलखेडी येथील रहीवाशी व बोदवड येथील राका हायस्कुलमध्ये कार्यरत शिक्षक रुबाब ईब्राहीम तडवी (वय-५२) ह. मु. फालक नगर भुसावळ याचा जखमीवस्थेत भुसावळ तालुक्यातील शिंदी गावाजवळ बुधवारी १० मार्च रोजी रात्री ८ वाजता संशयास्पद आढळून आले होते. त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. सदरची माहीती मिळताच शिंदी गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जख्मी अवस्थेत असलेले रूबाब तडवी यांना रूग्णवाहीकेव्दारे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

 मयत तडवी यांनी मंगळवारी हायस्कुलमधुन सुटी घेतली होती. रूबाब तडवी मुळ महेलखेडी ता . यावल येथील रहिवाशी असुन मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी , दोन मुल असे कुटुंब असुन , काल महेलखेळी गावात त्यांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेबाबतची नोंद भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे .

Protected Content