Home Cities चाळीसगाव मास्क वाटप करून वाढदिवस साजरा !

मास्क वाटप करून वाढदिवस साजरा !

0
45


चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना आटोक्यात राहण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपला वाढदिवस साजरा न करता तीन हजार पाचशे मास्क वाटप शहरात करून अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोना रूग्णांची संख्या शहरात दिवसागणिक वाढत असल्याने वाढदिवसाचे अनावश्यक खर्च टाळून येथील सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र बाबा गांगुर्डे यांनी शहरात ३५०० मास्कचे वाटप करून एक आदर्श उभा केला आहे. शहरातील सराफ बाजार, रथ गल्ली, सिग्नल पाँईट,बस स्टाँड ,गणेश रोड , पोलीस स्टेशन, वीर सावरकर चौक व वार्ड क्र.13 अशा ठिकाणी मास्कचे वाटप केले आहे. वाढदिवसाच्या खर्चातून त्यांनी हे खर्च केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आनंद गांगुर्डे, शरद सोनगिरे,अरुण अहिरे,प्रकाश पाटील, वैभव पाटील,अशोक जाधव, निंबा चौधरी, रोशन मांडोळे,सचिन गांगुर्डे आदी उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound