Home धर्म-समाज सातगाव येथील आश्रमशाळेत महिला दिन उत्साहात साजरा

सातगाव येथील आश्रमशाळेत महिला दिन उत्साहात साजरा

0
24

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांचा मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे (पाटील), मुख्याध्यापक राहूल पाटील व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही मुख्याध्यापक भारती पाटील, फिरोज खाटिक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच येथील बचत गटाच्या महिला व ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर यांच्या विद्यमाने गावातील महिलांना बोलावून त्यांचा सत्कार करून, मार्गदर्शन केले. यावेळी महिलांसाठी रक्त तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   यावेळी माजी उपसभापती अनिता पवार, सरपंच भरत राठोड, सदस्य आप्पा पाटील,  आकाश डांबरे, सदस्या शकीलाबाई तडवी, ज्ञानेश्वर चौधरी, डी. आर. वाघ, समुपदेशक सचिन सोनवणे, प्रतिभा परदेशी, योगिता थोरात, पुनम महाले, प्रतिमा विनोद परदेशी, जागृती वाणी, गुंताबाई वाघ, रुख्मनबाई मनगटे, चिंधाबाई पाटील, सुनील महाले, विनोद राजपूत, पंडित डांबरे, ग्रामसेवक के.डी. पवार, पोलीस पाटील दत्तू पाटील, आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound