Home क्राईम माजी जिल्हा परिषद सदस्य निनाजी खेवलकर यांचे निधन

माजी जिल्हा परिषद सदस्य निनाजी खेवलकर यांचे निधन

0
56

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य निनाजी भावडूजी खेवलकर यांचे आज निधन झाले.

निनाजी भावडूजी खेवलकर (वय ८२) यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरीव कामगिरी केली होती. ते सौ. प्रतिभाताई पाटील यांचे गुरूबंधू व विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत. तसेच पूर्णामाई ग्रामीण बिगरशेती पतपेढीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच ते तेली समाजाचे माजी अध्यक्ष देखील होते. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील एक ज्येष्ठ राजकीय व सामाजिक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound