Home आरोग्य बुलढाणा येथे पत्रकारांच्या लसीकरणास प्रारंभ

बुलढाणा येथे पत्रकारांच्या लसीकरणास प्रारंभ

0
93


बुलडाणा प्रतिनिधी । येथे कोविड योध्दा म्हणून कार्यरत असणार्‍या पत्रकारांच्या लसीकरणास प्रारंभ झाला असून जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीप शुक्ला यांनी सर्वप्रथम लस घेतली.

बुलडाणा जिल्ह्यात जेष्ठ नागरीक आणि दुर्धर आजाराने ग्रस्त अशा ४५ वय वर्षे असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्हा टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता संदीप शुक्ला यांनी लसीकरण करुन घेतले आहे.या लसीचा कुठला त्रास नसुन सर्व नागरिकांनी लसीकरण करुन यावे असे आवाहन असोसिएशनच्या वतीने त्यांनी केले आहे. यावेळी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष वसीम शेख,प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील हे उपस्थीत होते.


Protected Content

Play sound