भडगाव संजय पवार । येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी त्यावरील हरकती आणि अंतीम मतदार यादी प्रसिध्दीला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरपरीषद निवडणुक अंतिम यादी प्रसिध्द प्रक्रिया निवडणुक आयोगाच्या आदेशाने मार्च अखेर पर्यंत लांबणीवर पडली आहे. नगरपरीषद प्रारुप मतदार याद्या हरकती व अंतिम यादी प्रसिध्दीस वाढीव मुदत राज्य निवडणुक आयोगा कडुन देण्यात आला आहे.
राज्य निवडणुक आयोगा कडुन अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याचा दि.१ मार्च ऐवजी १५ मार्च तर मतदान केंद्र निहाय अंतिम यादी प्रसिध्दी दि. ८ मार्च ऐवजी दि. ३१ मार्च अखेर करण्यात येणार असल्याचे भडगाव नगर परीषद कार्यालयास राज्य निवडणुक आयोगाचे आवर सचिव संजय सांवत यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे. अशी माहिती मुख्यधिकारी विकास नवाळे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने ते ही काम प्रशासनाला करावे लागत आहे. भडगाव नगरपरीषद प्रभाग क्र.१ ते २१ चे प्रारूप मतदार यादीत काही मतदार बाबत हजारोच्या संख्येने हरकती अर्ज प्राप्त झाल्याने सदर हकतींचा निराकरण करण्यासाठी दिलेल्या कालावधीत नियमित कामे सांभाळुन निवडणुक काम करणे कर्मचारी वर्गास शक्य नाही. म्हणुन महाराष्ट्रातील सर्व न.प.निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाला मुदत वाढवुन मिळण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार निवडणुक आयोगाने ही विनती मान्य करत निवडणुक प्रक्रिया ही पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी नगरपरीषदेस वाढीव मुदत दिली आहे.
नगरपरीषद प्रारुप मतदार याद्या हरकती व अतिम यादी प्रसिध्दीस वाढीव कालावधी मिळाल्याने इच्छुक उमेदवारांची डोके दुखी वाढली असुन कार्यकर्ता सांभाळताना त्यांना मोठी आर्थिक कींमत मोजावी लागणार आहे. कार्यकर्त्याची नविन फळी उभी करण्यासाठी खुप त्रास घ्यावा लागणार आहे. निवडणुकीचे तयार झालेले वातावरणात कोरोना मुळे निवडणुक पुन्हा पुढे ढकलली गेली तर उमेदवारांना फार मोठा फटका बसेल असे राजकीय गोट्यात बोलले जात आहे.