यावल प्रतिनिधी । येथील यावल नगर परिषद साठवण तलावाच्या जॅकवेल
हाऊसमधील सुमारे २ लाख २० हजार रूपयांचे साहीत्य चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल नगर परिषदच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या जेकवॅल हाऊस मधील पक्या इमारतीच्या खोलीतुन दि.२५ ते २६ फेब्रुवारीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नगर परिषदच्या मालकीचे जेककॅल हाऊस खोलीचे शटर तोडुन व उघडुन आत प्रवेश करून ९० हजार रुपये किमतीची दोन ३० एचपी क्षमतेची इलेक्ट्रीकल मर्सिबल ओपन वेल पंप, तसेच ३५ स्केअर एमएम व्यासाचा कॉपर वायर ५० मीटर असे एकुण २ लाख२० हजार रुपये किमतीचे साहीत्य चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत यावल नगर परिषदचे पाणी पुरवठाचे प्रभारी अधिकारी व वरीष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे यांनी फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन ३४ / २०२१ भादवी कलम ३८० , ४५७ , ४२७ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठाण हे करीत आहे. दरम्यान या संपुर्ण शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावावर दोन सुरक्षा रक्षक असतांना अशा प्रकारे नगर परिषदच्या महागडया वस्तु चोरीस गेल्या कशा असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित केला जात आहे.